बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात उमेदवारी लादल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगला तलवारे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. धुळेत काँग्रेस पक्षाकडे विजयी होणारे व पक्षाचे पोटतिडकीने काम करणारे उमेदवार … The post बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा appeared first on पुढारी.

बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

मालेगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात उमेदवारी लादल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे.
महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगला तलवारे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. धुळेत काँग्रेस पक्षाकडे विजयी होणारे व पक्षाचे पोटतिडकीने काम करणारे उमेदवार असताना राज्यातील पक्षनेतृत्वाने भाजपच्या उमेदवाराला फायदा होण्यासाठी नाशिक शहरात अडगळीत पडलेल्या नेत्याची उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला.
Latest Marathi News बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.