शरद पवार भाजपसोबत जाण्यास 50 टक्के तयार होते : प्रफुल्ल पटेल

नागपूर : भाजपसोबत जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील 50 टक्के तयार होते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व इतर मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आमची वेळोवेळी सकारात्मक चर्चाही झाली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केल्यानंतर गुरुवारी पुन्हा राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
एका उद्योगपतींच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली बैठक हा त्याच प्रयत्नांचा एक भाग होता, असेही खा. पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पटेल बोलले ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे.
शरद पवारांनी आरोप फेटाळले
पटेल यांनी जे विधान केले, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपबरोबर जायला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले; पण भाजपमध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी आरोप फेटाळले.
Latest Marathi News शरद पवार भाजपसोबत जाण्यास 50 टक्के तयार होते : प्रफुल्ल पटेल Brought to You By : Bharat Live News Media.
