पंतप्रधानांनी घेतला उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीसाचा आढावा 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात उष्णतेच्या लाटेसंदर्भात तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. उष्णतेच्या लाटेदरम्यान अत्यावश्यक औषधी आणि संबंधित गोष्टींचाही आढावा घेण्यात आला. दरम्यान, टेलिव्हिजन, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या सर्व प्लॅटफॉर्मद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक जागरूकता वेळेवर प्रसारीत करण्यावर भर देण्यात आला. शासकीय दृष्टिकोनावर भर देताना पंतप्रधान … The post पंतप्रधानांनी घेतला उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीसाचा आढावा  appeared first on पुढारी.

पंतप्रधानांनी घेतला उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीसाचा आढावा 

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी काळात उष्णतेच्या लाटेसंदर्भात तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. उष्णतेच्या लाटेदरम्यान अत्यावश्यक औषधी आणि संबंधित गोष्टींचाही आढावा घेण्यात आला.

दरम्यान, टेलिव्हिजन, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या सर्व प्लॅटफॉर्मद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक जागरूकता वेळेवर प्रसारीत करण्यावर भर देण्यात आला. शासकीय दृष्टिकोनावर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील शासनाच्या सर्व घटकांनी आणि विविध मंत्रालयांनी एकत्रितपणे यावर काम करणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशी तयारी करण्यासोबतच जनजागृतीवरही पंतप्रधानांनी भर दिला. जंगलातील आग लवकर शोधून ती विझवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह सचिव, भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
Latest Marathi News पंतप्रधानांनी घेतला उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीसाचा आढावा  Brought to You By : Bharat Live News Media.