वर्धा : सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्री आर्णी परिसराला वादळी पावसाने झोडपले. सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळल्याने यात वीटभट्टीवरील मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. सिंधू सुभाष राठोड (४०) रा. अंतरगाव असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, धम्मपाल … The post वर्धा : सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

वर्धा : सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : मंगळवारी रात्री आर्णी परिसराला वादळी पावसाने झोडपले. सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळल्याने यात वीटभट्टीवरील मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

सिंधू सुभाष राठोड (४०) रा. अंतरगाव असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, धम्मपाल विष्णू भगत (४०), कल्पना धम्मपाल भगत (३५) आणि हर्षद धम्मपाल भगत (९) सर्व जण राहणार डोळंबा हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह – अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे आर्णी ते सावळी रोडवरील वीटभट्टीवर काम करीत असलेले मजूर ट्रॅक्टर ट्रॉली खाली आडोशाला बसल्या असता अचानक वीज कोसळली. अनिल राठोड यांनी जखमींना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन सिंधू यांना मृत घोषित केले. तर, जखमी तिघांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे जखमीवर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मृतकाची पुतणी सपना राजू चव्हाण (रा. अंतरगाव) हिने पोलिसांत माहिती दिली. त्यावरून आर्णी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
Latest Marathi News वर्धा : सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.