भटउमरा शाळेतील टीव्ही संच चोरी प्रकरणी दोघांना अटक; वाशिम ग्रामिण पोलिसांची कारवाई

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : भटउमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी देणगी म्हणून दिलेले टी.व्ही. संच अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी (दि. १०) पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने … The post भटउमरा शाळेतील टीव्ही संच चोरी प्रकरणी दोघांना अटक; वाशिम ग्रामिण पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

भटउमरा शाळेतील टीव्ही संच चोरी प्रकरणी दोघांना अटक; वाशिम ग्रामिण पोलिसांची कारवाई

वाशिम; Bharat Live News Media वृत्तसेवा : भटउमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी देणगी म्हणून दिलेले टी.व्ही. संच अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी (दि. १०) पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांनी सदर टी.व्ही.संच चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एकूण १९,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालासह पो.स्टे.वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक.अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पथक सपोनि. रमाकांत खंदारे, पोहवा. प्रशांत राजगुरू, पोना. ज्ञानदेव मात्रे, पोकॉ. विठ्ठल महाले, दिपक घुगे, चापोहवा. रमेश जामकर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
Latest Marathi News भटउमरा शाळेतील टीव्ही संच चोरी प्रकरणी दोघांना अटक; वाशिम ग्रामिण पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.