हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा : अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला कळमनुरी शहरात सुरुवात झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त लावण्यात आलेल्या डीजेचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी अभिनेता गोविंदा यांचा रोडशोतील डीजे बंद करण्याची मागणी करीत मिरवणूक थांबविली. याबाबतची माहिती आमदार संतोष बांगर … The post हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद appeared first on पुढारी.

हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद

कळमनुरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला कळमनुरी शहरात सुरुवात झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त लावण्यात आलेल्या डीजेचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी अभिनेता गोविंदा यांचा रोडशोतील डीजे बंद करण्याची मागणी करीत मिरवणूक थांबविली. याबाबतची माहिती आमदार संतोष बांगर यांना मिळताच त्यांनी मिरवणुकीमध्ये येऊन डीजे सुरू केल्यानंतर हा वाद मिटला.
कळमनुरी शहरात आज (दि.११) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक डीजेच्या गजरात काढण्यात आली होती.  परंतु पोलीस प्रशासनाने डीजेचे डेसिबल जास्त असल्याचे सांगून डीजे बंद केला. यावेळी काही तरुणांनी संतप्त व्यक्त केला. दरम्यान याच ठिकाणाहून अभिनेता गोविंदा यांचा रोड शो सुरु होता. त्यांच्याही मिरवणूकीतील डीजे बंद करण्याची मागणी संतप्त तरुणांनी केली. आणि मिरवणूक थांबविली. यावेळी मोठा वाद निर्माण सुरु झाला. हा वाद इतका वाढत असतानाच रोडशोमध्ये उपस्थित असलेले आमदार संतोष बांगर यांना हा प्रकार समजताच ते स्वतः मिरवणुकीमध्ये गेले. यावेळी त्यांनी डीजे वाजवा असे सांगितल्यानंतर डीजे सुरू करण्यात आला आमदार संतोष बांगर यांनी मध्यस्थिती केल्यामुळे वाद टळला.
Latest Marathi News हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद Brought to You By : Bharat Live News Media.