दररोज १५ मिनिटे व्‍यायामाचाही माेठा फायदा! जाणून घ्‍या नवे संशोधन …

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रोजच्‍या जगण्‍याच्‍या धावपळीत नियमित व्‍यायाम करणे, हे मोठे जिकरीचं ठरते. कोणत्‍याही गोष्‍टीत सातत्‍य असेल तरच त्‍याचे सकारात्‍मक परिणाम मिळतात. व्‍यायामाचेही तसेच आहे. तुम्‍ही दररोज १५ मिनिटांचा व्‍यायाम केला तरी तुमच्‍या प्रतिकारशक्‍तीमध्‍ये वाढ होते, असे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. (Exercise Every Day) जाणून घेवूया या संशोधनाविषयी… नुकतेच अमेरिकन फिजिओलॉजी समिटमध्ये नव्‍या … The post दररोज १५ मिनिटे व्‍यायामाचाही माेठा फायदा! जाणून घ्‍या नवे संशोधन … appeared first on पुढारी.

दररोज १५ मिनिटे व्‍यायामाचाही माेठा फायदा! जाणून घ्‍या नवे संशोधन …

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : रोजच्‍या जगण्‍याच्‍या धावपळीत नियमित व्‍यायाम करणे, हे मोठे जिकरीचं ठरते. कोणत्‍याही गोष्‍टीत सातत्‍य असेल तरच त्‍याचे सकारात्‍मक परिणाम मिळतात. व्‍यायामाचेही तसेच आहे. तुम्‍ही दररोज १५ मिनिटांचा व्‍यायाम केला तरी तुमच्‍या प्रतिकारशक्‍तीमध्‍ये वाढ होते, असे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. (Exercise Every Day) जाणून घेवूया या संशोधनाविषयी…
नुकतेच अमेरिकन फिजिओलॉजी समिटमध्ये नव्‍या संशोधन सादर करण्यात आले. दररोजच्‍या काही मिनिटेशारीरिक हालचालींमुळे शरीरात नैसर्गिक किलर (NK) पेशींचे उत्पादन वाढते, असे या संशोधनात नमूद केल्‍याचे वृत्त ‘हेल्थलाइन’ने दिले आहे. हे संशोधन अद्याप पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेले नाही.
काही मिनिटांच्‍या व्‍यायामामुळे ‘NK’ पेशींमध्‍ये वाढ
नैसर्गिक किलर( NK) पेशी आपल्या जन्मजात रोगप्रतिकारक शक्‍तीचा भाग आहेत, या संसर्गाशी लढा देणार्‍या एक प्रकारच्‍या पांढर्‍या पेशीच असतात. व्यायामाला रक्तप्रवाहातील NK पेशींच्या वाढीशी जोडणारा हा पहिला अभ्यास नाही. यापूर्वीही शारीरिक हालचालींनंतर काही मिनिटांत NK पेशींची संख्या वाढलेली दिसले आहे. मात्र संशोधकांनी दावा केला आहे की, नवीन निष्कर्षांमुळे कमी कालावधीचा व्‍यायाम अहा शरीरातील एनके पेशींना लक्ष्य केल्याने संक्रमण आणि रोगांपासून चांगले संरक्षण मिळू शकते.
‘हेल्थलाइन’शी बोलताना स्टॅनफोर्ड मेडिसिन येथील फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशनचे प्राध्यापक मायकेल फ्रेडरिकसन यांनी सांगितले की, नवीन संशोधन सांगते की नियमित कमी वेळात व्यायाम करणे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी आणि रक्ताभिसरणात शरीरातील नैसर्गिक किलर पेशी वाढवण्यासाठी पुरेसे आहे,”
Exercise Every Day : असे झाले संशोधन…
संशोधकांनी केलेल्‍या अभ्‍यासात १८ ते ४० वयोगटातील व्‍यक्‍तींचा सहभाग घेतला. त्‍यांना मध्यम-स्तरीय तीव्रतेवर दररोज १५ आणि ३० मिनिटे सायकल चालवली. यानंतर त्‍याच्‍या रक्‍ताचे नमुने घेतले गेले. यामध्‍ये आढळले की, १५ मिनिटांच्या सायकलिंगनंतर NK पेशींची पातळी वाढली; परंतु ३० मिनिटांच्या सायकलिंगनंतर या पेशींची वाढ झालेले आढळलं नाही. संशोधक हे सूचित करतात की, सुमारे 15 मिनिटे व्यायाम केल्याने NK पेशी मोठ्या प्रमाणात वाढतात, जे रोगांपासून अर्थपूर्ण संरक्षण प्रदान करू शकतात.
“एनके पेशी सतत शरीराला घातक असणार्‍या पेशींच्या शोधात असतात. नैसर्गिक किलर पेशी या पांढऱ्या रक्त पेशी असतात ज्या कर्करोगाच्या पेशींसारख्या संक्रमित आणि रोगग्रस्त पेशी नष्ट करण्यात मदत करतात, असेही मायकेल फ्रेडरिकसन यांनी स्‍पष्‍ट केले.

A new study finds that short bouts of exercise can help boost your immune system. This is linked to the production of “natural killer” cells which are a type of white blood cell. https://t.co/8ItSsUXeaS
— Healthline (@Healthline) April 8, 2024

हेही वाचा : 

Health tips : निस्तेजता आणि अकाली वार्धक्य आलंय; जाणून घ्या आयुर्वेदीक उपाय
Mental Health | आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?
Health Tips : चिरतरुण राहायचंय? तर हा आहे सल्ला!

 
The post दररोज १५ मिनिटे व्‍यायामाचाही माेठा फायदा! जाणून घ्‍या नवे संशोधन … appeared first on Bharat Live News Media.