बीड : परळीत जोरदार पाऊस; वीज कोसळून म्हशीचा मृत्यू

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा : बीड जिल्ह्याला आज (दि.११) अवकाळी पावसाने झोडपून काढले असून परळी तालुक्यातही वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परळी तालुक्यातील खामगाव येथे झालेल्या पावसात वीज कोसळून एक म्हैस दगावल्याची घटना घडली आहे.
परळी तालुक्यात बुधवार (दि.१०) पासून वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. आज (दि.११) झालेल्या जोरदार पावसात वीज कोसळून खामगाव येथील शरद प्रल्हाद बडे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. परिसरातील काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून काही घरांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांना नुकसानीचा फटका बसला आहे.
हेही वाचा :
त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास
परभणी : पूर्णा येथील लिमला परिसरात गारांचा पाऊस
रावेर तालुक्यात 6 लाखांची गांजाची झाडे जप्त, संशयिताला अटक
Latest Marathi News बीड : परळीत जोरदार पाऊस; वीज कोसळून म्हशीचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
