जिल्हा रुग्णालयात जखमींमध्ये तुंबळ हाणामारी

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- उपचारासाठी दाखल झालेल्या दोन गटातील युवकांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात तुंबळ हाणामारी केल्याची घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी घडली. संशयितांनी एकमेकांना बेदम मारहाण करीत रुग्णालयातील खुर्ची व इतर साहित्यांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकाराने रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी, इतर रुग्णांमध्ये घबराट पसरली होती. (Nashik Civil Hospital)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नानावली परिसरात दोन गटात वाद झाला. मागील भांडणाची कुरापत काढून दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना मारहाण केली. मारहाणीत दुखापत झाल्याने तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिघांवर उपचार सुरु होत असतानाच पुन्हा त्यांच्यात वाद झाले. तिघांसह इतरांनी पुन्हा रुग्णालयातच हाणामारी केली. आरडाओरड, मिळेल त्या साहित्याने एकमेकांना मारहाण करीत असल्याचे इतरांमध्ये घबराट पसरली. याची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्यासह पथकाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मारामारी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वातावरण शांत केले. तसेच जखमींवर उपचार करण्यात आले. यात एक संशयित गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा –
एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊन चूक झाल्याची शरद पवारांची कबुली, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
Hardik Pandya : हार्दिक पंड्याला भावानेच लावला चूना! कोट्यवधींची केली फसवणूक, गुन्हा दाखल
Pooja Tadas News: मला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरले; पूजा तडस यांचा आरोप
Latest Marathi News जिल्हा रुग्णालयात जखमींमध्ये तुंबळ हाणामारी Brought to You By : Bharat Live News Media.
