परभणी : पूर्णा येथील लिमला परिसरात गारांचा पाऊस

पूर्णा; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील लिमला गाव व परिसरात आज (दि.११) सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुसळधार पावसासह जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या वादळीवा-यासह अवकाळी पाऊसाबरोबर पंधरा ते वीस मिनिटे मोठ्या गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पाऊस व गारांच्या मारामुळे शेतातील कापून टाकलेला कडबा चारा, अंबा फळबाग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
लिमला येथे गारांचा मोठा खच साचला होता. तर परिसरातील गाव शिवारातही अवकाळी पाऊसासह गारा पडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. गौर परिसरातही वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
हेही वाचा :
lok sabha election 2024 : छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील
Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक
बीड : अवकाळी पावसाने धारूर, वडवणी तालुक्याला झोडपले
Latest Marathi News परभणी : पूर्णा येथील लिमला परिसरात गारांचा पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.
