छत्रपती संभाजीनगर : ढोरकीनमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी चिंताजनक झाल्यामुळे पिण्याचं पाणी राखीव ठेवण्यासाठी नियोजन सुरू असतानाच रस्ते दुरुस्ती करण्याच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे पाणीपुरवठा पाईपलाईन फोडण्याचा सिलसिला थांबत नसून आज (दि.११) दुपारी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ढोरकीन परिसरात फुटल्यामुळे भरउन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून या गावाचा उरूस असल्यामुळे … The post छत्रपती संभाजीनगर : ढोरकीनमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : ढोरकीनमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी चिंताजनक झाल्यामुळे पिण्याचं पाणी राखीव ठेवण्यासाठी नियोजन सुरू असतानाच रस्ते दुरुस्ती करण्याच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे पाणीपुरवठा पाईपलाईन फोडण्याचा सिलसिला थांबत नसून आज (दि.११) दुपारी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ढोरकीन परिसरात फुटल्यामुळे भरउन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून या गावाचा उरूस असल्यामुळे रस्त्यावर जमलेल्या पाण्यामुळे काही तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील मुख्य रस्त्याचे काम दिवसा व रात्री सुरू असून संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे व या कामावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने यापूर्वी पिंपळवाडी पिं, जायकवाडी परिसरातून छत्रपती संभाजीनगर, पैठण येथे पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फोडण्याचा आली होती. यावेळी रस्त्यालयाच्या व्यापाऱ्याची मोठी नुकसान झाली होती. संबंधित ठेकेदाराला योग्यरीत्या काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्याचा सिलसिला सुरूच असून. गुरुवारी रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन ढोरकिन गावाच्या पुलाजवळ फुटल्यामुळे भरउन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाले असून. रस्त्यावर साचलेल्या व गावामध्ये उरूस असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कुंडी झाली झाल्याने. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे, बीट जमादार करतारासिंग सिंगल यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका च्या पाणीपुरवठा विभागाला कळविले व वाहतूक सुरळीत केले.
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : ढोरकीनमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया Brought to You By : Bharat Live News Media.