एकनाथ खडसेंना पक्षात घेऊन चूक झाल्याची शरद पवारांची कबुली

जळगाव- एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देऊन आपली मोठी चुक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या जवळ दिल्याची माहिती माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी मध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते. मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढला तर … The post एकनाथ खडसेंना पक्षात घेऊन चूक झाल्याची शरद पवारांची कबुली appeared first on पुढारी.

एकनाथ खडसेंना पक्षात घेऊन चूक झाल्याची शरद पवारांची कबुली

जळगाव- एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश देऊन आपली मोठी चुक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या जवळ दिल्याची माहिती माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी मध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते. मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे झाल्याचे डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली त्याच वेळी आपण शरद पवार यांना त्या बाबत नकार दिला होता. ते आपल्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी मध्ये येत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी आपण तुमचे ऐकले नाही ही आपली मोठी चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी परवा पुण्यात झालेल्या बैठकीत दिल्याचे राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे ऐवजी त्यावेळी एखाद्या होतकरू आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांला संधी दिली असती तर आज जिल्ह्यात पक्षाची ताकद ही चार पट वाढली असती. शिवाय आज जो रावेर साठी उमेदवार शोधण्याचा त्रास झाला तोही झाला नसता असेही डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले आहे. सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी आपल्या आजारपणाचे कारण देत उमेदवारी नाकारली आहे. ही एकनाथ खडसे यांची खेळी होती ती आता उघड झाली असल्याचे पाटील म्हणाले.
हेही वाचा –

कोल्हापूर : उदगाव येथे तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून
Pooja Tadas News: मला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरले; पूजा तडस यांचा आरोप

Latest Marathi News एकनाथ खडसेंना पक्षात घेऊन चूक झाल्याची शरद पवारांची कबुली Brought to You By : Bharat Live News Media.