बंगळुरूला दुसरा धक्का; विल जॅक्स बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. सामन्यात मुंबईने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर होत आहे. (MI vs CSK)
बंगळुरूला दुसरा धक्का; विल जॅक्स बाद
सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये विल जॅक्सच्या रूपात बंगळुरूचा दुसरा फलंदाज बाद झाला. त्याला आकाश मधवालने टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. विल जॅक्सने आपल्या खेळीत 6 बॉलमध्ये 8 धावांची खेळी केली.
बंगळुरूला ‘विराट’ धक्का; कोहली 3 धावा करून बाद
सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीला बाद करत बुमराहने बंगळुरूला पहिला धक्का दिला. बुमराहने त्याला विकेटकीपर इशानकरवी झेलबाद केले. विराटने आपल्या खेळीत 9 बॉलमध्ये 3 धावांची खेळी केली.
दोन्ही संघात बदल
मुंबईने पीयूष चावलाच्या जागी श्रेयस गोपालला संघात स्थान दिले आहे. तर आरसीबीने संघात तीन बदल केले आहे. विल जॅक, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार व्यासक यांना संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात विल जॅकला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या सामन्यात मुंबई टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी आणि गेराल्ड कोएत्झी या चार परदेशी खेळाडूंसोबत खेळताना दिसत आहे. त्याचवेळी आरसीबीने विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि रीस टोपले यांच्या रूपाने चार विदेशी खेळाडूंना मैदानात उतरवले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश प्रभुदेसाई, सौरव चौहान, स्वप्नील सिंग, राजन कुमार, कर्ण शर्मा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट प्लेयर : सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई.
Toss News – @mipaltan have won the toss and elect to bowl first against @RCBTweets.
Live – https://t.co/7yWt2ui23H #TATAIPL #IPL2024 #MIvRCB pic.twitter.com/ajXbJkD7MB
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
हेही वाचा :
lok sabha election 2024 : छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील
Nashik News | खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, 12 लाखांची मागणी; खंडणीचा गुन्हा दाखल
Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक
Latest Marathi News बंगळुरूला दुसरा धक्का; विल जॅक्स बाद Brought to You By : Bharat Live News Media.
