माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ

सिडको : पुढारी वृत्तसेवा- माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेचे सिडको परिसरात माहेर आहे. विवाहिता दि. २९ जानेवारी २०२२ ते दि. १० एप्रिल २०२४ या कालावधीत सासरी नांदत होती. त्यावेळी पती महेश श्रीराम पाटील … The post माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ appeared first on पुढारी.

माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ

सिडको : Bharat Live News Media वृत्तसेवा- माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेचे सिडको परिसरात माहेर आहे. विवाहिता दि. २९ जानेवारी २०२२ ते दि. १० एप्रिल २०२४ या कालावधीत सासरी नांदत होती. त्यावेळी पती महेश श्रीराम पाटील (वय ३१), सासू भटाबाई श्रीराम पाटील (वय ५०), दीर जगदीश श्रीराम पाटील (वय २८), सासरे श्रीराम राजाराम पाटील (वय ५५, चौघेही रा. लोणखेडी, ता. साक्री, जि. धुळे) व सुवर्णा जयवंत जाधव (वय ३४, रा. अशोकनगर, सातपूर) यांनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेने माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा –

lok sabha election 2024 : छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील
Pooja Tadas News: मला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरले; पूजा तडस यांचा आरोप
MPSC Result : ऐंशी हजार उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत

Latest Marathi News माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ Brought to You By : Bharat Live News Media.