कोल्हापूर : उदगाव येथे तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून

जयसिंगपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथे कुपवाडच्या (जि. सांगली) युवकाचा करून निर्घृण खून केल्याची घटना आज (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास घडली. हा खून इतका निर्दयी करण्यात आला आहे की, हाताची बोटे तुटून बाजूला पडली आहेत. शिवाय डोक्यात गंभीर वार करुन हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी डॉक्टर रोहिणी सोळंके, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह यांच्या पोलीस फौजफाटा उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे सांगली कोल्हापूर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.
Latest Marathi News कोल्हापूर : उदगाव येथे तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून Brought to You By : Bharat Live News Media.
