छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : lok sabha election 2024 : ‘खासदार संजय मंडलिक हे स्वत:च्या स्वार्थासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांवर टीका करत आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरची जनता हा अपमान सहन करणार नाही. सुरुवात त्यांनी केलीय, शेवट कोल्हापूरची जनता करेल,’ असे जोरदार प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी खा. संजय मंडलिक यांना दिले. खासदार मंडलिक यांनी श्रीमंत शाहू … The post छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील appeared first on पुढारी.

छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : lok sabha election 2024 : ‘खासदार संजय मंडलिक हे स्वत:च्या स्वार्थासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांवर टीका करत आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरची जनता हा अपमान सहन करणार नाही. सुरुवात त्यांनी केलीय, शेवट कोल्हापूरची जनता करेल,’ असे जोरदार प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी खा. संजय मंडलिक यांना दिले. खासदार मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ते बोलत होते.
सतेज पाटील पुढे म्हणाले की, ‘कोल्हापूरकर हा अपमान सहन करणार नाहीत. हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे. कुठल्याही परिस्थितीत जनता भीक घालणार नाही. खासदार मंडलिक यांनी माफी मागावी’, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या निवडणुकीची सुरूवात झाली त्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांबद्दल कोणीही वैयक्तिक टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अशा सुचना देऊनही संजय मंडलिक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी शाहू महारांजांविरुद्ध विधान करत आहेत. खरेतर त्यांना मतदानापूर्वीच आपला पराभव दिसत आहे. त्यातूनच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
संजय मंडलिक काय म्हणाले?
आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचे संजय मंडलिक म्हणाले. मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचा नाही, मग ती कुस्ती कशी होणार? असाही सवाल संजय मंडलिक यांनी केला आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिकांनी अशा वक्तव्यांची मालिका केली.
Latest Marathi News छत्रपती घराण्याचा अपमान सहन करणार नाही : सतेज पाटील Brought to You By : Bharat Live News Media.