खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- 10 टक्के दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देत मुद्दल आणि व्याज मिळून पैसे घेतल्यानंतरही पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव देवरे (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. गाेविंदनगर येथील … The post खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- 10 टक्के दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देत मुद्दल आणि व्याज मिळून पैसे घेतल्यानंतरही पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव देवरे (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती.
गाेविंदनगर येथील रहिवासी व व्यावसायिक विजय खानकरी (५०) यांनी देवरेविराेधात फिर्याद दाखल केली आहे. ते सप्टेंबर २०२३ मध्ये आजारी पडल्यामुळे त्यांना उपचारासाठी पैशांची गरज भासली होती. त्यांनी संशयित वैभवकडून 10 टक्के व्याजदराने तीन लाख रुपये घेतले होते. वैभवकडे तीन लाख रुपयांवर दरमहा ३० हजार रुपये व्याजासह चार लाख ४७ हजार रुपये भरले. त्यात मुद्दलाचाही समावेश होता. कर्ज फिटल्याने खानकरी हे देवरेकडे दिलेला ‘सिक्युरिटी चेक’ घेण्यास गेले. मात्र वैभवने त्यांना चेक देण्यास टाळाटाळ करत ‘दोन महिन्यांसाठी कर्ज घेतले होते, मात्र तुम्ही वेळेत न भरल्याने मुद्दल व व्याज मिळून १२ लाख रुपये द्यावे लागतील’ असे वैभवने सांगत पैशांचा तगादा लावला. भीतीपोटी खानकरी यांनी वैभवला सहा लाख रुपयांचा धनादेश दिला. उर्वरित पैसे दिले नाही, तर खानकरींसह पत्नी व मुलांचे हातपाय तोडेन, कार ओढून नेईन अशी धमकी वैभवने दिली होती. वैभवकडील वसुलीच्या तगाद्यास कंटाळून खानकरी यांनी नातलग व इतरांना ही माहिती दिली. त्यानंतर खानकरी यांनी वैभवविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वैभवला अटक केली. न्यायालयाने वैभवला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित वैभव देवरे हा शहरातील राजकीय नेत्याच्या संपर्कात आहे. त्याने व्याजाने पैसे देत कर्जदारांना दमदाटी करीत फसवल्याची चर्चा आहे. मात्र तक्रारदार नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे समजते. खानकरी यांनी मुद्दल व व्याज भरूनही त्यांच्याकडे पुन्हा १२ लाखांची मागणी केल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा –
रावेर तालुक्यात 6 लाखांची गांजाची झाडे जप्त, संशयिताला अटक
Ratnagiri News | कोकणातलं पर्यटन कोण संपवतंय?; अनिल परबांच्या निकटवर्तीयाचं कोकणवासियांना पत्र
Latest Marathi News खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.