आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
संजय मंडलिक पुढे म्हणाले की, माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपले. मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचा नाही, मग ती कुस्ती कशी होणार? असाही सवाल संजय मंडलिक यांनी यावेळी केला.
कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांच्याविरूद्द महायुतीकडून कोण? याबाबत संभ्रमावस्था होती. अखेर शिवसेनेकडून विद्यमान खा. संजय मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याने शाहू महाराज आणि खा. मंडलिक यांच्यातच मैदान होणार असल्याने साहजिकच हाय होल्टेज लढत होईल.
Latest Marathi News आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक Brought to You By : Bharat Live News Media.
