अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते-पाटील करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी धैर्यशील मोहीते-पाटील हे दोन दिवसांत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते-पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आज याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील हे जाहीर झालं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी यांच्यापाठोपाठ अतुल देशमुख यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावनंतर मोहिते पाटील यांच्याविषयी देखील माहिती देण्यात आली. धैर्यशील मोहीते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या १४ तारखेला ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर १६ एप्रिल रोजी माढ्यातून उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान यावेळी शरद पवार यांनी आगामी निवडणूकीपूर्वी आमच्या पक्षात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असल्याचेही सांगितले.
Latest Marathi News अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते-पाटील करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.
