सोशल मीडियावर फुटबॉल ‘वॉर’ जाणून घ्या काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्‍या एक व्‍हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्‍हायलर होत आहे. अर्जेटिंनाचा कर्णधार लियोनल मेस्‍सी हा आपल्‍या संघासह थेट प्रेक्षकात घुसल्‍याचा हा व्‍हिडिओ आहे. बुधवार, २२ नाेव्‍हेंबर राेजी झालेल्या सामन्यातील प्रकरणामुळे संपूर्ण फुटबॉल विश्वाला धक्का बसला आहे. या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांवर केलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहेत. जाणून घेवूया अर्जेंटिना … The post सोशल मीडियावर फुटबॉल ‘वॉर’ जाणून घ्या काय आहे कारण? appeared first on पुढारी.
#image_title
सोशल मीडियावर फुटबॉल ‘वॉर’ जाणून घ्या काय आहे कारण?


पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्‍या एक व्‍हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्‍हायलर होत आहे. अर्जेटिंनाचा कर्णधार लियोनल मेस्‍सी हा आपल्‍या संघासह थेट प्रेक्षकात घुसल्‍याचा हा व्‍हिडिओ आहे. बुधवार, २२ नाेव्‍हेंबर राेजी झालेल्या सामन्यातील प्रकरणामुळे संपूर्ण फुटबॉल विश्वाला धक्का बसला आहे. या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांवर केलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहेत. जाणून घेवूया अर्जेंटिना आणि ब्राझील सामन्‍यावेळी नेमकं काय घडलं याविषयी…
बुधवारी (दि.22) रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामना खेळवण्यात आला.  सामन्यादरम्यान ब्राझीलचे पोलीस आणि अर्जेंटिनाच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. यानंतर ब्राझील पोलिसांनी अर्जेंटिनाच्या समर्थकांवर लाठीचार्ज केला. (Argentina Brazil Fans Clash)
मेस्‍सीच्‍या नेतृत्त्‍वाखाली अर्जेंटिनाच्या खेळाडूंची थेट चाहत्यांकडे धाव
साेशल मीडियावर व्‍हायरल हाेत असलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये ब्राझील पाेलीस अर्जेंटिना फुटबाॅल चाहत्‍यांना लाठीमार करताना दिसत आहेत. या लाठीमारात अेनक प्रेक्षक रक्‍तबंबाळ झाले. हे विदारक दृश्य पाहून अर्जेंटीनाच्या खेळाडू संतप्‍त झाले. त्‍यांनी समर्थकांना वाचवण्यासाठी थेट स्टँडच्या दिशेने धावले. त्‍यांनी पोलिसांना ओरडून चाहत्‍यांना मारहाण थांबवण्याचे आव्हान केले. अखेर पोलीस लाठीमार करताना थांबले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ब्राझीलच्या चाहत्यांनी उडवली मेस्सीची खिल्ली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या प्रेक्षक यांच्यात एका स्टँडमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान काही चाहत्यांनी आक्रमकपणे खुर्च्या फोडल्या. यावेळी ब्राझीलच्या चाहत्यांनी अर्जेंटीनाचा कर्णधार मेस्सीची खिल्ली उडवली. (Argentina Brazil Fans Clash)
२२मिनिटे सामना थांबला (Argentina Brazil Fans Clash)
पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच काही चाहत्यांनी ब्राझीलच्या पोलिसांवर हल्ला केला. चाहत्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे चिडलेल्या अर्जेंटीच्या मेस्सीने परिस्थिती शांत झाल्यावरच मैदानात परणार असल्याचे स्पष्ट केले आणि तो सहका-यांना घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेला. ज्यामुळे 22 मिनिटे हा सामना थांबला.
विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिना अव्वल स्थानावर
अर्जेंटिना फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत (दक्षिण अमेरिका खंड) पाच सामन्यांतून 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ब्राझील पाचव्या स्थानावर आहे. दहा संघांच्या राऊंड-रॉबिन पात्रता स्पर्धेत दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने गमावले होते. मात्र, या सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला.
सामन्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘आम्ही पाहिले की ते ब्राझीलचे पोलिस आमच्या चाहत्यांना कसे मारत आहेत, हे लिबर्टाडोरेसच्या फायनलमध्ये आधीच घडले होते. खेळापेक्षा त्याचे लक्ष त्याकडेच होते. आम्ही लॉकर रूममध्ये गेलो कारण सर्व काही शांत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता.’

Here’s how it all started Brazil vs Argentina fight 💔pic.twitter.com/wHEblg5MtG
— IBRAHEEM👑 (@AYONITEMI0001) November 22, 2023

हेही वाचा :

Weather Forecast : मुंबईसह ‘या’ चार जिल्ह्यांत यलो अलर्ट; वादळी वाऱ्याची शक्यता
BJP On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ECI कडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती

The post सोशल मीडियावर फुटबॉल ‘वॉर’ जाणून घ्या काय आहे कारण? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्‍या एक व्‍हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्‍हायलर होत आहे. अर्जेटिंनाचा कर्णधार लियोनल मेस्‍सी हा आपल्‍या संघासह थेट प्रेक्षकात घुसल्‍याचा हा व्‍हिडिओ आहे. बुधवार, २२ नाेव्‍हेंबर राेजी झालेल्या सामन्यातील प्रकरणामुळे संपूर्ण फुटबॉल विश्वाला धक्का बसला आहे. या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांवर केलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहेत. जाणून घेवूया अर्जेंटिना …

The post सोशल मीडियावर फुटबॉल ‘वॉर’ जाणून घ्या काय आहे कारण? appeared first on पुढारी.

Go to Source