नार्को टेस्ट करा ! वडेट्टीवारांचा मंत्री आत्राम यांना सल्ला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: धर्मरावबाबा आत्राम यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून देणे, गडचिरोलीमध्ये भाजप हरली तर मंत्रीपद जाईल; या भीतीने आत्राम हे बिनबुडाचे आरोप करताहेत. त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला आहे. आत्राम यांना ही बुद्धी कुठून सुचली? असा सवालही त्यांनी केला आहे. … The post नार्को टेस्ट करा ! वडेट्टीवारांचा मंत्री आत्राम यांना सल्ला appeared first on पुढारी.

नार्को टेस्ट करा ! वडेट्टीवारांचा मंत्री आत्राम यांना सल्ला

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: धर्मरावबाबा आत्राम यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून देणे, गडचिरोलीमध्ये भाजप हरली तर मंत्रीपद जाईल; या भीतीने आत्राम हे बिनबुडाचे आरोप करताहेत. त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला आहे. आत्राम यांना ही बुद्धी कुठून सुचली? असा सवालही त्यांनी केला आहे. गडचिरोलीमध्ये मी तळ ठोकून आहे, म्हणून मला त्रास देण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (Nagpur News)
पुढे बोलताना  वडेट्टीवार म्हणाले, धर्मरावबाबा अत्राम यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात कमळाला लीड मिळवून दाखवावे. हेच तिकडे संजय शिरसाट बोलतात, तुम्हाला कोणी कुत्र विचारत नाही तिथे असा हल्ला चढविताना तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार का माहित नाही? लोकसभेत गोची केली. तिथे जाऊन गुलाम होऊन जगत आहेत? असा हल्लाबोल मंत्री आत्राम यांच्यावर वडेट्टीवार यांनी केला आहे. (Nagpur News)
दुसऱ्याला बदनाम करु नका. स्वतः बेइमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे बिनबुडाचे आरोप आहेत. गडचिरोलीत आम्ही जिंकत आहोत, हे नावाला राजे आहेत. त्यामुळे भाजपसमोर झुकले आणि आता यांची इच्छा असेल इतरांनी झुकावे पण आम्ही स्वाभिमानी आहोत, काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच 4 जूनलाच कळेल गडचिरोलीमध्ये काँग्रेसच राजा आहे ते आणि यांची जागा यांना दिसेल असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. (Nagpur News)
Latest Marathi News नार्को टेस्ट करा ! वडेट्टीवारांचा मंत्री आत्राम यांना सल्ला Brought to You By : Bharat Live News Media.