गंभीरला दिलेल्‍या ‘जादू की झप्पी’वर विराटने सोडले मौन, म्‍हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान गौतम गंभीरला मारलेल्‍या मिठीबद्दल विराट कोहलीने मौन सोडले आहे.चिन्नास्वामी मैदानावर आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान KKR मार्गदर्शक गौतम गंभीर आणि आरसीबीचा स्‍टार फलंदाज विराट कोहली यांनी मारलेली मिठी हा चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही वर्ष या दोघांमध्‍ये सुरु असलेल्‍या संघर्षाला पूर्णविराम मिळाल्‍याची चर्चा आहे. … … The post गंभीरला दिलेल्‍या ‘जादू की झप्पी’वर विराटने सोडले मौन, म्‍हणाला… appeared first on पुढारी.
गंभीरला दिलेल्‍या ‘जादू की झप्पी’वर विराटने सोडले मौन, म्‍हणाला…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान गौतम गंभीरला मारलेल्‍या मिठीबद्दल विराट कोहलीने मौन सोडले आहे.चिन्नास्वामी मैदानावर आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान KKR मार्गदर्शक गौतम गंभीर आणि आरसीबीचा स्‍टार फलंदाज विराट कोहली यांनी मारलेली मिठी हा चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही वर्ष या दोघांमध्‍ये सुरु असलेल्‍या संघर्षाला पूर्णविराम मिळाल्‍याची चर्चा आहे.
… त्‍यांच्‍यासाठीचा ‘मसाला’ संपला
आता विराट कोहिलने यावर आपलं मत व्‍यक्‍त केले आहे.  त्‍याने म्‍हटले आहे की, माझा आणि गौतम गंभीरच्‍या कृतीने काही जण निराश झाले आहेत. कारण त्यांच्यासाठी ‘मसाला’ संपला आहे.मागील आयपीएल स्‍पर्धेत विराट आणि गंभीर यांच्‍यातील संघर्ष चव्‍हाट्यावर आला होता. लखनऊमध्ये आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले होते. मात्र यंदाच्‍या आयपीएल सामन्‍यात दोघांनीही एकमेकांना मिठी मारत या वादावर पडदा टाकला. चाहत्यांची मने जिंकली.
“माझ्या वागण्याने लोक निराश झाले आहेत. मी नवीनला मिठी मारली आणि गौतम भाईंनीही त्या दिवशी मला मिठी मारली. त्यामुळे त्यांचा मसाला हरवला,” असेही विराटने स्‍पष्‍ट केले.
कोहलीने दिल्लीतील विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीनसोबतचे भांडण संपवले होते. आरसीबी या हंगामात फॉर्मसाठी संघर्ष करत आहे, तर कोहलीने आयपीएल 2024 हंगामात आपल्या संघासाठी एकमात्र लढाई लढवली आहे. विराटने या हंगामात 316 धावा केल्या आहेत. तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. KKR विरुद्धच्या सामन्यादरम्यान कोहलीने गंभीरसोबत मिठी मारली होती. या सामन्‍यात त्याने 83 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला होता.

Our favourite strategic timeout ever 🫂#IPLonJioCinema #RCBvKKR #TATAIPL #JioCinemaSports pic.twitter.com/A50VPhD6RI
— JioCinema (@JioCinema) March 29, 2024

हेही वाचा :

IPL 2024 : पराभवापाठोपाठ १२ लाखांचा दंडही, संजू सॅमसनला ‘दुहेरी’ धक्‍का!
IPL 2024 : मुंबई इंडियन्सने विजयासह रचला विक्रम, KKR आणि CSK राहिले मागे
IPL 2024 : इशांतच्या ‘यॉर्कर’समोर रसेलचे लोटांगण! आऊट झाल्‍यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया ( पाहा व्‍हिडिओ )

 
Latest Marathi News गंभीरला दिलेल्‍या ‘जादू की झप्पी’वर विराटने सोडले मौन, म्‍हणाला… Brought to You By : Bharat Live News Media.