परभणी : ताडकळस-पूर्णा महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : ताडकळस-पूर्णा राज्य महामार्गावरील हटकरवाडी शिवारात ताडकसळहून पूर्णेकडे भरधाव वेगाने जाणा-या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने या घटनेत जिवितहानी टळली, मात्र कंटेरनचे मोठे नुकसान झाले आहे.
पूर्णा तालूक्यातील ताडकळस-पूर्णा राज्य महामार्ग (क्रमांक ६१) वर मंगळवारी (दि.११) सकाळी साडेदहाच्या सुमारास ताडकसळहून पूर्णेच्या दिशेने सुसाट वेगात कंटेनर (क्र. एम एच ४६ ए आर ६९२०) निघाला होता. यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी खात रस्त्याच्या बाजूला आडवा झाला. त्यातील चालक आणि क्लिनरला किरकोळ दुखापत झाली. पलटी झालेल्या कंटेनरची मोडतोड होवून मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :
लातूर: उदगीर-निलंगा मार्गावर कार, ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार
परभणी : ताडकळसमध्ये वादळी वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस
पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई
Latest Marathi News परभणी : ताडकळस-पूर्णा महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी Brought to You By : Bharat Live News Media.
