कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्येक वेळी मशीनमध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. बोगद्यामध्ये तुटलेल्या मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सुरू असून उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. यानंतर बोगद्यात मशिनऐवजी केवळ मॅन्युअल काम केले जाईल. ज्याला २४ तास लागतील. म्हणजेच … The post कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ? appeared first on पुढारी.
#image_title

कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्येक वेळी मशीनमध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. बोगद्यामध्ये तुटलेल्या मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सुरू असून उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. यानंतर बोगद्यात मशिनऐवजी केवळ मॅन्युअल काम केले जाईल. ज्याला २४ तास लागतील. म्हणजेच पुढील दोन ते तीन दिवस कामगारांना बोगद्यात थांबावे लागण्याची शक्यता वर्तविला जात आहे. Uttarkashi Tunnel Rescue
यापुढे ऑगर ड्रिलिंग होणार नाही: अर्नोल्ड डिक्स
आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अर्नोल्ड डिक्स म्हणाले की, अनेक मार्ग आहेत. हा फक्त एक मार्ग नाही. सध्या सर्व काही ठीक आहे. तुम्हाला यापुढे ऑगर पाहायला मिळणार नाही. ऑगर तुटलेले असून यापुढे काम करणार नाही आणि नवीन ऑगर येणार नाही.
Uttarkashi Tunnel Rescue : खोदण्याचे काम पुन्हा सुरू केले जाईल
बोगदा तज्ज्ञ कर्नल परीक्षित मेहरा यांनी सांगितले की, ऑगर मशिनचे औगर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ज्याला काही वेळ लागू शकतो. औगर बाहेर काढताच पुन्हा ड्रिलिंगचा प्रयत्न केला जाईल.
ऑगर मशीन अडकल्याने रेस्क्यू ऑपरेशनला धक्का
ऑगर मशिन अडकल्याने बचाव कार्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. अधिकारीही माध्यमांशी बोलणे टाळत आहेत. दुसरीकडे, शनिवारी सिल्क्यरा बोगद्याच्या वरच्या भागात पाण्याची गळती वाढल्याने चिंताही वाढली आहे.

#WATCH | Damaged blades of the auger drilling machine brought out of Uttarkashi’s Silkyara tunnel, where operation is underway to rescue 41 trapped workers pic.twitter.com/OZe8TE9C0G
— ANI (@ANI) November 25, 2023

हेही वाचा 

Vertical Drilling : उत्तरकाशी – ऑगर मशीनमध्ये पुन्हा बिघाड, ४१ कामगारांच्या बचावासाठी आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्याय?
Uttarkashi tunnel rescue | उत्तरकाशी- बचावकार्यात अडथळे, मुख्यमंत्री धामी यांचा बोगद्याच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठीचे बचावकार्य अंतिम टप्प्यात; वीस रुग्णवाहिका दाखल

The post कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्येक वेळी मशीनमध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. बोगद्यामध्ये तुटलेल्या मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सुरू असून उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. यानंतर बोगद्यात मशिनऐवजी केवळ मॅन्युअल काम केले जाईल. ज्याला २४ तास लागतील. म्हणजेच …

The post कामगारांचा बोगद्यातील मुक्काम २ ते ३ दिवस लांबणीवर ? appeared first on पुढारी.

Go to Source