
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि बोनी कपूर यांच्या ‘मैदान’ ( Maidaan Movie ) हा चित्रपट १० एप्रिल रोजी चाहत्याच्या भेटीस येणार होता. मात्र, आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकमधील म्हैसूर न्यायालयाने ‘मैदान’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर नुकतेच बंदी घातली आहे.
संबंधित बातम्या
Ajay Devgn Maidaan Trailer : दमदार स्टाईलमध्ये आला अजय देवगनच्या ‘मैदान’चा ट्रेलर
constable manju : रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका
Actor Salman Khan : ३० वर्षापूर्वी सलमानच्या ‘या’ चित्रपटाने जमवला होता १०० कोटीचा गल्ला, १ वर्ष चित्रपट चित्रपटगृहात चालला
म्हैसूरमधील पटकथा लेखक अनिल कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांनी त्यांची कथा चोरल्याचा आरोप केला आहे. यानंतर कर्नाटकातील म्हैसूरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा आदेश जारी केला आहे. यानंतर तेथे चित्रपट प्रदर्शनास बंदी घातली गेली.
बोनी कपूर आणि झी स्टुडिओज निर्मित Maidaan Movie या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली आहे. भारताचे माजी फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ‘मैदान’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. अमित रविंदरनाथ शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, प्रियमणी, गजराज राव, रुद्रनील घोष, मधुर मित्तल आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
@ZeeStudios_ pic.twitter.com/2C8EThwhSa
— BayViewProjectsLLP (@BayViewProjOffl) April 10, 2024
Latest Marathi News अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर घातली बंदी Brought to You By : Bharat Live News Media.
