‘पंजा’ वर लढण्यास विनोद घोसाळकरांचा नकार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते विनोद घोसाळकर यांना काँग्रेसच्या ’पंजा’ निशाणीवर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, घोसाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारत आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी काँग्रेसने हा मतदार संघ शिवसेनेला दिल्यास आपण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार, अशी इच्छा व्यक्त केली. जागावाटप निश्चित झाले असले तरी … The post ‘पंजा’ वर लढण्यास विनोद घोसाळकरांचा नकार appeared first on पुढारी.

‘पंजा’ वर लढण्यास विनोद घोसाळकरांचा नकार

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते विनोद घोसाळकर यांना काँग्रेसच्या ’पंजा’ निशाणीवर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, घोसाळकर यांनी हा प्रस्ताव नाकारत आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी काँग्रेसने हा मतदार संघ शिवसेनेला दिल्यास आपण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार, अशी इच्छा व्यक्त केली.
जागावाटप निश्चित झाले असले तरी महाविकास आघाडीत काही जागांवरून अजूनही तणाव आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आहे. मात्र, उत्तर मुंबई मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) घ्यावा, या मागणीसाठी उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर बोलताना, विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले.
मी गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे केवळ लोकसभा निवडणुकीसाठी मी असा निर्णय घेऊ शकत नाही आणि तो प्रस्ताव मला मान्य नाही, असे पटोले यांना सांगितल्याचे घोसाळकर म्हणाले. स्वतःचा पक्ष आणि चिन्ह असताना, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रश्न येत नाही, असे घोसाळकर म्हणाले.
घोसाळकर यांनी उत्तर मुंबईतून प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आघाडीचा धर्म पाळत घोसाळकर हे तेथून माघार घेतील, असे स्पष्ट केले होते. परंतु, ठाकरेंच्या उत्तर मुंबईतील पदाधिकार्‍यांनी बुधवारी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा, अशी मागणी केली.
Latest Marathi News ‘पंजा’ वर लढण्यास विनोद घोसाळकरांचा नकार Brought to You By : Bharat Live News Media.