महात्मा जोतिराव फुले जयंती | आज तब्बल दहा हजार किलोंची मिसळ

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मटकी 2000 किलो… कांदा 1600 किलो… आले 400 किलो…. लसूण 400 किलो अन् मिसळ मसाला 280 किलो… असे विविध साहित्य वापरून 10 हजार किलोंची मिसळ तयार करण्यात असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल… पण, हे खरंय… मोठ्या कढईत तब्बल 10 हजार किलोंची मिसळ बनविण्यात येणार आहे अन् ही झणझणीत मिसळ पुणेकरांना चाखता येणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही मिसळ तयार करण्यात येणार आहे. महात्मा फुले वाड्यात मिसळ बनविण्याची तयारीही झाली आहे.
गुरुवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे मिसळ तयार करणार आहेत. सकाळी सातपासून मिसळ वाटप होणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येत सात हजार किलोंचा विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेल्या कढईत मिसळ तयार केली जाणार आहे. महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने 11 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करून अभिवादनाकरिता येणार्या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
याविषयी समिचीचे विजय रजपूत म्हणाले, महात्मा फुले वाड्यात अभिवादनाकरिता येणार्या नागरिकांना मिसळचे वाटप केले जाणार आहे. मिसळ तयार करण्याकरिता 15 बाय 15 फूट आकारातील कढई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची 6.5 फूट असून, वजन 2500 किलो आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करून कढई साकारण्यात आली आहे. मिसळचे वाटप सकाळी सातपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा
नाशिक लोकसभा 2024 | खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातून
Lok Sabha Election 2024 : वसंतदादांची पुण्याई फळाला येण्याची चिन्हे!
बाटलीने प्रशासन लावले कामाला : निवडणूक काळात प्रशासन सतर्क
Latest Marathi News महात्मा जोतिराव फुले जयंती | आज तब्बल दहा हजार किलोंची मिसळ Brought to You By : Bharat Live News Media.
