आंबेडकर जयंतीचा बँनर समाजकंटकांनी फाडला : भवानीनगरमध्ये तणाव

भवानीनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : भवानीनगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लावलेला बॅनर समाजकंटकाने फाडून पेटवल्याने तणाव निर्माण झाला. गुरुवारी (दि 11) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून भवानीनगर व्यापार पेठेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते यातील एक बॅनर संबंधित समाजकंटकाने तलवारीने फाडून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. संबंधित समाजकंटकाला भीमसैनिकांनी पकडून भवानीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला त्वरित अटक केली आहे संबंधित समाजकंटकावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसैनिकांनी केली आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : वसंतदादांची पुण्याई फळाला येण्याची चिन्हे!
Lok Sabha Election 2024 | मनसेचा महायुतीला पाठिंबा; नाशिकमध्ये होईल काय फायदा?
बाटलीने प्रशासन लावले कामाला : निवडणूक काळात प्रशासन सतर्क
Latest Marathi News आंबेडकर जयंतीचा बँनर समाजकंटकांनी फाडला : भवानीनगरमध्ये तणाव Brought to You By : Bharat Live News Media.
