पुणे : वाहन क्रमांकांची ‘चॉईस’ जोरात..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या आवडीचा, व्हीव्हीआयपी असलेला, आकर्षक नंबरमधून नाव तयार होणार्या ‘चॉईस नंबर’ची विक्री यंदा पुणे आरटीओत जोरात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे आरटीओला 11 कोटींचा अधिकचा महसूल मिळाला आहे.
सर्वाधिक महसूल मिळवणारे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून पुणे आरटीओ कार्यालयाची ओळख आहे. ती ओळख पुणे आरटीओने यंदाच्या आर्थिक वर्षातदेखील कायम ठेवल्याचे समोर आले आहे.
एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात पुणे आरटीओला 49 कोटी 82 लाख 84 हजार 738 रुपयांचा महसूल फक्त ‘चॉईस क्रमांकां’च्या विक्रीतून प्राप्त झाला आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 38 कोटी 19 लाख 65 हजार 495 रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा यात तब्बल 11 कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाला आणि परिवहन विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
हेही वाचा
बाटलीने प्रशासन लावले कामाला : निवडणूक काळात प्रशासन सतर्क
Nashik Onion Auction | लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार
NMC Nashik | महापालिकेची अग्निशमन यंत्रणा मोडकळीस
Latest Marathi News पुणे : वाहन क्रमांकांची ‘चॉईस’ जोरात..! Brought to You By : Bharat Live News Media.
