बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश

Bharat Live News Media ऑनलाईन : गुजरात सरकारने धर्मांतराबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे आणि हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कोणत्याही धर्मांतरासाठी गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट, २००३ च्या तरतुदींनुसार संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे.
बौद्ध धर्मांतराबाबतच्या अर्जांवर नियमानुसार कार्यवाही होत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने ८ एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकावर गृह विभागाचे उपसचिव विजय बधेका यांची स्वाक्षरी आहे.
गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांदरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये बहुतांश दलित मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. गुजरात सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की जिल्हा न्यायदंडाधिकारी कार्यालये गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्टची मनमानी पद्धतीने अंमलबजावणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या अर्जांवर केली जाणारी प्रक्रिया नियमानुसार होत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच काहीवेळेला अर्जदार आणि स्वायत्त संस्थांकडून अशी निवेदन आली आहेत की हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक नाही.
“ज्या प्रकरणांमध्ये पूर्वपरवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले जातात. त्यावर संबंधित कार्यालये असे अर्ज निकाली काढत आहेत आणि असे नमूद केले जात आहे की घटनेच्या कलम २५(२) नुसार शीख, जैन आणि बौद्ध धर्म हे हिंदू धर्मात समाविष्ट आहेत आणि त्यामुळे अर्जदाराला अशा धर्मांतरासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.” पण “कायदेशीर तरतुदींचा पुरेशी माहिती न घेता धर्मांतरासारख्या संवेदनशील विषयावर अर्जदारांना दिलेली उत्तरे न्यायालयीन कक्षेमध्ये येऊ शकतात,” असेही परिपत्रकात म्हटले आहे.
The post बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश
बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश
पुढारी ऑनलाईन : गुजरात सरकारने धर्मांतराबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे आणि हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कोणत्याही धर्मांतरासाठी गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट, २००३ च्या तरतुदींनुसार संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. बौद्ध धर्मांतराबाबतच्या अर्जांवर नियमानुसार कार्यवाही …
The post बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश appeared first on पुढारी.
