पुलवामात सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत एक दहशतवादी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील फ्रासीपोरा येथे गुरुवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसराची घेराबंदी केली आहे. तसेच येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. (Pulwama Encounter)
या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यादरम्यान मुरान भागात गोळीबार सुरु झाला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला मारले.
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने नुकताच हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर जवळपास एक आठवड्यानंतर पुलवामा जिल्ह्यात चकमक झाली, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
VIDEO | An encounter broke out between security forces and terrorists in Jammu and Kashmir’s #Pulwama. More details are awaited.
(Visuals deferred by unspecified time.) pic.twitter.com/3Qv4VtHdkL
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2024
Latest Marathi News पुलवामात सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत एक दहशतवादी ठार Brought to You By : Bharat Live News Media.
