इस्रायचा गाझावर हवाई हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याची ३ मुले ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गाझा पट्टीमध्ये ईस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख नेता इस्माईल हनीयेहची ३ मुले ठार झाली आहेत. पॅलेस्टिनी इस्लामी गट इस्माईलच्या कुटुंबाकडून या हल्ल्याची पुष्टी केली आहे. IDF ने दावा केला आहे की हनीयेहची अमीर, हाझेम आणि मोहम्मद या तीघांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इस्रायली लष्कर आयडीएफ (IDF) ने दावा केला आहे की हनीयेहची तीन मुले अमीर, हाझेम आणि मोहम्मद गाझामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी जात असताना हवाई हल्ल्यात सापडले. इस्माईल हनीयेहने अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेरुसलेम आणि अल-अक्सा मशीद स्वतंत्र करण्यासाठी झालेल्या युद्धात त्यांच्या चार मुलांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ते म्हणाले की, शत्रूला वाटते की हमास नेत्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करून ते आपल्याला नमते घेतील. यामुळे आम्ही आमच्या मागण्यांपासून मागे हटू. माझ्या मुलांना लक्ष्य करून ते हमासला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडतील, असे कोणाला वाटत असेल, तर तो भ्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Latest Marathi News इस्रायचा गाझावर हवाई हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याची ३ मुले ठार Brought to You By : Bharat Live News Media.
