कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य

नॉम पे : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नसून, ते आग्नेय आशियातील एक देश ‘कंबोडिया’त आहे. तब्बल 162.6 हेक्टर जागेतील हे विष्णुमंदिर बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने उभे केले होते. आता या मंदिराने जगातील आठवे आश्चर्य बनण्याचा किताब पटकावला आहे. अर्थात ही यादी अनौपचारिक आहे. यापूर्वी आठवे आश्चर्य म्हणून इटलीतील पोम्पेईचे स्थान होते. … The post कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य appeared first on पुढारी.
#image_title

कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य

नॉम पे : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नसून, ते आग्नेय आशियातील एक देश ‘कंबोडिया’त आहे. तब्बल 162.6 हेक्टर जागेतील हे विष्णुमंदिर बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने उभे केले होते. आता या मंदिराने जगातील आठवे आश्चर्य बनण्याचा किताब पटकावला आहे. अर्थात ही यादी अनौपचारिक आहे. यापूर्वी आठवे आश्चर्य म्हणून इटलीतील पोम्पेईचे स्थान होते. आता पोम्पेई या यादीतून बाहेर पडले असून, अंकोर वटला हे अनौपचारिकरित्या स्थान मिळाले आहे.
संबंधित बातम्या : 

अन् समुद्रात उतरले विमान!
व्हॉटस्अ‍ॅपमध्ये चॅटसाठी येणार ‘एआय’चे भन्नाट फिचर
‘त्या’ धूमकेतूवर वारंवार होत आहेत स्फोट
एलियन्सचे जग सापडल्‍याचा ‘त्‍या’ दाेन संशाेधकांचा दावा

अंकोर वट हे युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट असलेले स्थळ आहे. हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असून याबाबत त्याची गिनिज बुकमध्येही नोंद आहे. या मंदिराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या भव्य मंदिराची आखीव-रेखीव रचना, भिंतीवरील शिल्पकृती थक्क करणार्‍याच आहेत. मंदिरावर अनेक पौराणिक कथांवर आधारित शिल्पकृती पाहायला मिळतात. मंदिराच्या चारही बाजूला पाण्याने भरलेला खंदक आहे. या मंदिरात सूर्योदयाचे सुंदर द़ृश्य पाहण्यासाठीही अनेक लोक येतात. अंकोर वट मंदिराच्या उभारणीसाठी 28 वर्षे लागली होती. सन 1122 ते सन 1150 पर्यंत या मंदिराचे बांधकाम सुरू होते. राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या मृत्यूनंतर या मंदिराचे रुपांतर हळूहळू बौद्ध स्थळामध्ये झाले.
हेही वाचा : 

एक लाख वर्षांपूर्वी चप्पल घालत होता माणूस!
चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती?

The post कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य appeared first on पुढारी.

नॉम पे : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नसून, ते आग्नेय आशियातील एक देश ‘कंबोडिया’त आहे. तब्बल 162.6 हेक्टर जागेतील हे विष्णुमंदिर बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने उभे केले होते. आता या मंदिराने जगातील आठवे आश्चर्य बनण्याचा किताब पटकावला आहे. अर्थात ही यादी अनौपचारिक आहे. यापूर्वी आठवे आश्चर्य म्हणून इटलीतील पोम्पेईचे स्थान होते. …

The post कंबोडियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बनले आठवे आश्चर्य appeared first on पुढारी.

Go to Source