गोंदिया : खामकुरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी; महामार्ग २७५ वरील खामकुरा गावाजवळील घटना

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : कंपाउंड वॉलचे पोल व साहित्य भरून जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला. चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवार (ता.१०) सकाळच्या सुमारास घडली. वडसा-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक २७५ वर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामकुरा गावाजवळ ही दुर्घटना
सुरेश काशीराम शेंद्रे (वय ५५ रा. पठाणटोला, ता. सालेकसा जि. गोंदिया) असे मृतकाचे नाव असून जखमी मध्ये केवलचंद चैतराम चौधरी (वय २६ रा. बामणी, ता. सालेकसा ) रवींद्र भाऊलाल आत्राम (वय ४० रा. पांढरवाडी, ता. सालेकसा) बिश्वेश्वर छोटेलाल नागपुरे (वय २६) संदीप अशोक बागडे (वय २८) दोन्ही राहणार बामणी पठाणटोला, ता. सालेकसा, ट्रक चालक बाबूदास भाऊलाल नागपूरे (वय ४० रा. सीतागोठा ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छ.ग.) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमींना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल केले. अपघात एवढा भीषण होता की मृतक व जखमी हे शेताच्या बांधातील चिखलामध्ये ट्रक खाली दबल्या गेली होती. दरम्यान, जेसीबीच्या साह्याने तसेच खामकुरा ग्रामस्थाच्या परिश्रमाने मृतक व जखमींना बाहेर काढण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड पोलीस हवालदार डोंगरवार करीत आहेत.
Latest Marathi News गोंदिया : खामकुरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी; महामार्ग २७५ वरील खामकुरा गावाजवळील घटना Brought to You By : Bharat Live News Media.
