वर्धा : तीन महिन्यांत ४५ गुन्हेगार हद्दपार, ६ जेलबंद; ३१९१ आरोपींवर वेगवेगळ्या कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे मागील अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत ४५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे तर सहा गुन्हेगारांना जेल बंद करण्यात आलेले आहेत पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे.
वर्धा पोलीस दलाने १ जानेवारीपासून आजवर वेगवेगळ्या गुन्हे करणाऱ्या ३१९१ आरोपीवर वेगवेगळ्या कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई केली आहे. पोलिसांनी भारतीय फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 107,109,110 अन्वये 2658 प्रस्ताव संबधीत तहसिल कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे पाठविण्यात आले होते. मुबंई पोलीस कायदा कलम 55,56,57 अन्वये 79 प्रस्ताव पोलीस अधिक्षक वर्धा व उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते. मुंबई दारुबंदी अधिनियम कलम 93 अन्वये 444 प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते. एमपीडिए कायद्या अंतर्गत 10 प्रस्ताव पाठवण्यात आलेत. जिल्ह्यात 3191 प्रस्ताव वेगवेगळ्या गुन्हे करणाऱ्या आरोपीवर संबंधीत अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते.
सर्व पालीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे आरोपीवर बंधपत्र घेण्यासाठी शिबीर घेण्यात आले. आजवर 1224 जणांचे अंतीम बंधपत्र व 957 जणांचे अंतरिम बंधपत्र आहे. वारंवार गुन्हे करणा-या आरोर्पीना मुबंई पोलीस कायदा कलम 55, 56, 57 अन्वये आतापर्यंत 45 इसमांना जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. तसेच एमपीडिए कायद्या अंतर्गत 6 इसमांना जेलबंद करण्यात आले आहे.
Latest Marathi News वर्धा : तीन महिन्यांत ४५ गुन्हेगार हद्दपार, ६ जेलबंद; ३१९१ आरोपींवर वेगवेगळ्या कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.
