सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखा : मल्लिकार्जून खर्गे यांचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशातील ६२ टक्के सैनिकी शाळा भाजप आणि रा. स्व. संघाच्या ताब्यात असल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांना पत्र लिहून सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखण्याची मागणी केली आहे. माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात एकूण ३३ सैनिकी शाळा आहेत. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत. केंद्रसरकारने २०२१ … The post सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखा : मल्लिकार्जून खर्गे यांचे राष्ट्रपतींना पत्र appeared first on पुढारी.

सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखा : मल्लिकार्जून खर्गे यांचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा :  देशातील ६२ टक्के सैनिकी शाळा भाजप आणि रा. स्व. संघाच्या ताब्यात असल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांना पत्र लिहून सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखण्याची मागणी केली आहे.

माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात एकूण ३३ सैनिकी शाळा आहेत. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत. केंद्रसरकारने २०२१ मध्ये या शाळांचे खासगीकरण करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार नव्याने सुरू होणाऱ्या १०० सैनिकी  शाळांपैकी ४० शाळा पीपीपी पद्धतीने चालवल्या जाणार आहेत.

या शाळांमधील सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्रसरकार योग्यतेच्या आधारावर ५० टक्के वार्षिक शुल्क सवलत प्रदान करणार आहे. सामंजस्य करार झालेल्या ६२ टक्के शाळा भाजप व रा स्व. संघाशी संबंधित व्यक्तींच्या आहेत.

त्यामध्ये एका मुख्यमंत्र्यांचे कुटुंब,अनेक आमदार, भाजपचे पदाधिकारी आणि  आरएसएस नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात केला आहे.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि भारतीय नौसेना अकादमीमध्ये दाखल होण्यासाठी सैनिकी शाळांची भूमिका महत्वपूर्ण आहे. सैनिकी शाळांचे खाजगीकरण धोरण आणि याबाबतचा सामंजस्य करार तत्काळ रद्द करण्याची मागणीही खर्गे यांनी पत्रातून केली आहे..
The post सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखा : मल्लिकार्जून खर्गे यांचे राष्ट्रपतींना पत्र appeared first on Bharat Live News Media.

Go to Source