कोल्हापूर : स्मशानभुमीत लाल दोरा, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली; वडगावात भानामती प्रकरणाची चर्चा

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभुमीत भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस आला आहे.  स्मशानभुमीत लाल दोऱ्याने, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली आढळून आल्याने हे प्रकरण समोर आले. मृतदेह जाळण्यात येत असलेल्या लोखंडी जाळीत ही बाहुली आणि एका लिंबूला मोळे मारुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच नारळ, हळद-कुंकू स्मशानात सर्वत्र टाकल्याने हे … The post कोल्हापूर : स्मशानभुमीत लाल दोरा, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली; वडगावात भानामती प्रकरणाची चर्चा appeared first on पुढारी.

कोल्हापूर : स्मशानभुमीत लाल दोरा, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली; वडगावात भानामती प्रकरणाची चर्चा

शिरोली एमआयडीसी; Bharat Live News Media वृत्तसेवा : मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभुमीत भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस आला आहे.  स्मशानभुमीत लाल दोऱ्याने, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली आढळून आल्याने हे प्रकरण समोर आले. मृतदेह जाळण्यात येत असलेल्या लोखंडी जाळीत ही बाहुली आणि एका लिंबूला मोळे मारुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच नारळ, हळद-कुंकू स्मशानात सर्वत्र टाकल्याने हे प्रकरण भानामतीचे असावे अशी चर्चा गावात सुरु आहे.
स्मशानात अमावस्येच्या मुहूर्तावर अंधश्रद्धेपोटी काही तांत्रिक मांत्रिक अघोरी कृत्ये करत असतात. या घटना काही समाजासाठी नविन नाहीत. पण अशा घटनांनी समाजात भितीचे वातावरण निर्माण होते. गत वर्षी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान गावातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. पण त्यावेळेस नागरिकांकडून या घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या चर्चा आहेत.
साडेतीन मुहूर्ता पैकी एक असणाऱ्या गुढी पाडवा मुहूर्ताच्या आणि अमावस्येच्या पूर्व संध्येला असा प्रकार गावातील स्मशानात घडल्याने गावात नक्कीच जादूटोणा, भूत उतरविणे चमत्काराचा प्रयोग करून गुप्तधन, करणी, भानामती , कोणाच्या तरी  नावाने अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य करण्याचा प्रयोग करण्यात आला असल्याचा या प्रकारामुळे दिसून येत आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि हा अघोरी प्रकार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : स्मशानभुमीत लाल दोरा, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली; वडगावात भानामती प्रकरणाची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.