सांगली : पलूसमध्ये मनसे जिल्हा उपाध्यक्षावर चाकूहल्ला

पलूस; Bharat Live News Media वृत्तसेवा : पलूस येथे मनसे जिल्हा उपाध्यक्षावर आज (दि.१०) भरदुपारी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी दादा गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही, रा. पलूस) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अविनाश संभाजी जाधव (वय ४५ वर्ष) रा.बांबवडे ता पलुस यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश संभाजी जाधव (रा, बांबवडे) हे आपल्या कामानिमित्त पलूस येथे आले होते. आपले काम आटपून दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून बांबवडेला जात होते. यावेळी आंधळी रोड येथील एका दुकानासमोर संशयित आरोपीने पाठीमागून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर संशयित आरोपी गायकवाड याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. जखमी फिर्यादी जाधव यांनी अवैध व्यवसायाबद्दल पलूस पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले होते. त्याचा राग मनात धरून गायकवाड याने जाधव यांना दमदाटी करून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले , सपोनि प्रवीण साळुंखे करत आहेत.
हेही वाचा :
Pune News : हाँगकाँगमधील रॅकेटचा पर्दाफाश: पुण्यातील ५ जणांना अटक
हृदयद्रावक | परभणी: रवळगाव येथे टेबलफॅनचा शाॅक लागून मायलेकीचा मृत्यू
जळगाव : ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून सव्वा लाखांची रक्कम पोबारा
Latest Marathi News सांगली : पलूसमध्ये मनसे जिल्हा उपाध्यक्षावर चाकूहल्ला Brought to You By : Bharat Live News Media.
