धुळे लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी पालकमंत्री शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून अखेर काँग्रेसने माझी पालकमंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता धुळ्यात भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे, काँग्रेस कडून डॉक्टर शोभा बच्छाव आणि बहुजन वंचित आघाडी कडून अब्दुर रहमान अशी तिरंगी लढत होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची जनतेमधून प्रतीक्षा सुरू होती. भारतीय जनता पार्टी कडून डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्या वेळेस खासदारकीची संधी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपले संपर्क अभियान देखील सुरू केले. मात्र महाविकास आघाडी कडून उमेदवारी बाबत संभ्रमाचे वातावरण असल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर आज धुळ्याच्या माजी पालकमंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून डॉक्टर बच्छाव तर महायुतीकडून डॉक्टर भांमरे अशी दोन डॉक्टर मध्ये लढत रंगणार आहे. बहुजन वंचित आघाडीने यापूर्वीच माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वेल्फेअर पार्टी कडून डॉक्टर मोहम्मद जैद हे उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत धुळ्यातून तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Latest Marathi News धुळे लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी पालकमंत्री शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.
