Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रामटेकमधील कन्हान येथे आज (दि. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीचे इतर नेते पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत बोलताना पीएम मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. दरम्यान काँग्रेसवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, खरेतर काँग्रेसने देशभरात संविधाना कधीच लागू केले नाही. याचे उत्तम उदाहण म्हणजे जम्मू-काश्मीरसाठी लागू केले 370 कलम. पण भाजप सरकारने 370 कलम हटवून देशात संविधानाची अंमलबाजवणी केली, असा घणाघात केला.
‘प्रभु श्री रामचंद्राच्या पावन भूमीमध्ये मला येण्याचा योग आला हे माझं भाग्य आहे. रामटेक म्हणजे रामाची भूमी आहे. रामटेकच्या भूमीला प्रभु रामाच्या चरणांचा स्पर्श झाला आहे. या भूमीत येऊन मी पुण्य कमवले आहे, अशी भावनाही पीएम मोदींनी व्यक्त केली.
संविधान धोक्यात येणार हा विरोधकांचा खोटा प्रचार
संविधान धोक्यात येणार हा विरोधकांचा खोटा प्रचार सुरु आहे. मोदींवर शिव्या म्हणजे पुन्हा मोदी सरकार हे लक्षात ठेवा. पण एक लक्षात घ्या पाण्यात काठी मारल्यावर पाण्याचे दोन भाग होऊ शकत नाही.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पासून वंचित ठेवलं
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. काँग्रेसने घाराणेशाहीला प्रोत्साहन दिले. अनुसूचित जाती जमातींना दुर्लक्षित केलं आहे. काँग्रेसकडे कोणतीही नवीन संकल्पना नाहीए अशी टीका त्यांनी केली.
गेली ७० वर्षे संपूर्ण देशभरात संविधान नव्हते
काँग्रेसने जम्मू काश्मिर मध्ये ३७० कलम लागू ठेवलेलं होतं. त्यांची हिंमत कधीच झाली नाही हे कलम हटवण्याची कारण का तर देशभरात जाळपोळ होईल विरोध होईल. मोदी सरकारने हे काम केलं आणि देशभरात शांतता ठेवण्याचंही काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांना देखील या कार्यामुळे अभिवादन दिले आहे. गेली ७० वर्षे संविधानापासून काही भाग दूर होते. संपूर्ण देशभरात संविधान लागू केलं आहे. हे काम भाजप सरकारने केलं आहे.
इंडिया आघाडीने गरिबांसाठी काय केलय असा सवालही उपस्थित केला. संविधानासोबत सीएए सारखा कायदा देखील लागू केला आहे. इंडिया आघाडीने असं काय केलंय जे त्यांना सांगता येतं असा सवाल उपस्थित करत पीएम मोदींनी कामाचा दाखला दिला. शेतकऱ्यांना अजून निर्भर करण्यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे.
आमच्याकडे नागपूरसारख्या शहरात विकासाचा पाढा
नागपूरसारख्या शहरात विकासाचा पाढा आमच्याकडे आहे. मेट्रोसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्गामुळे या पूर्ण क्षेत्राचा विकास होत आहे. गेल्या १० वर्षात खूप काही कामे झाली आहेत. हा फक्त ट्रेलर आहे. अजून भरपूर कामं इथं होणार असल्याचा विश्वास पीएम मोदींनी व्यक्त केला.
मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येक क्षण हा देशासाठी असेल
मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येक क्षण हा देशासाठी असेल. २४ तास तुमच्यासाठी काम करेन. त्यामुळे एनडीएच्या प्रत्येक उमेदवाराला भरुभरुन मतदान करा. कितीही गरमी असली तरी प्रत्येकानं मतदान चुकवायचं नाही. प्रत्येक पोलिंग बुथवर साक्षर बनवा. तुमच्या माझ्या माध्यमातून मी माझा राम राम प्रत्येक घरात पोहचवाल हे माझं काम तुम्ही कराल ही अपेक्षा आहे.
Latest Marathi News ‘देशभरात संविधान लागू करण्याची हिंमत फक्त भाजप सरकारने दाखवली’ : पीएम मोदी Brought to You By : Bharat Live News Media.