वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही शत्रू नाही : देवेंद्र फडणवीस
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे झालेल्या अपघातानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, नाना पटोले असे म्हणतील, असे मला वाटत नाही. अपघाताबाबत कळाल्यानंतर मी नाना पटोले यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी शेवटी एकमेकांचे शत्रू नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, वैचारिक अशा प्रकारचा सामना आमच्यात सातत्याने सुरू असतो, मात्र ते माझे मित्रच आहेत. त्यांच्या अपघाताबद्दल मला समजल्यानंतर मी त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. अपघात मोठा होता, मात्र मी बचावलो, असे ते मला म्हणाले, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा होणार असून चंद्रपूरला जसा प्रतिसाद मिळाला तसा रामटेकमध्ये देखील मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :
रश्मी बर्वेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही! उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याविरोधातील याचिका फेटाळली
अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच आगमन
सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी : नाना पटोले
Latest Marathi News वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही शत्रू नाही : देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.