रेल्वेचे डबे, इंजिन, चाके भंगारात: सोलापूर विभागाने कमावले ४२.६४ कोटी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रवासी व माल वाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतूनही 42.64 कोटी रुपये कमावले आहेत. Solapur Railway सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय साहित्य (सामग्री) व्यवस्थापक रामचरण मीना आणि सहाय्यक विभागीय साहित्य व्यवस्थापक रमेशचंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली … The post रेल्वेचे डबे, इंजिन, चाके भंगारात: सोलापूर विभागाने कमावले ४२.६४ कोटी appeared first on पुढारी.

रेल्वेचे डबे, इंजिन, चाके भंगारात: सोलापूर विभागाने कमावले ४२.६४ कोटी

सोलापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रवासी व माल वाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतूनही 42.64 कोटी रुपये कमावले आहेत. Solapur Railway
सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय साहित्य (सामग्री) व्यवस्थापक रामचरण मीना आणि सहाय्यक विभागीय साहित्य व्यवस्थापक रमेशचंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली साहित्य व्यवस्थापन विभागाने ’शून्य भंगार’ उपक्रमास गती देत उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळविले. Solapur Railway
आर्थिक वर्ष 2023-24 च्या कालावधीत कमाल 35 कोटी रुपये भंगार विक्रीतून मिळविण्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाच्या तुलनेत 42.64 कोटी रुपये कमावत तब्बल 21.82 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. सोलापूर विभागाने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स, रेल्वे डब्बे यांसह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे, हे ’शून्य-भंगार’ उपक्रमाचा भाग असल्याचे सोलापूर विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मुख्य कार्यालय अधीक्षक भरत बनसोडे, अश्विन राणा आणि डेपो सामग्री अधीक्षक एम भरतकुमार यांनी प्रयत्न केले.
हेही वाचा 

सोलापूर: बंगळूरू-कलबुर्गी-बंगळूरसाठी रेल्वेच्या अतिरिक्त २० फेऱ्या
सोलापूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सौर उर्जेवर चालणाऱ्या ई-सायकलची निर्मिती
Solapur Railway Station : सोलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी: रेल्वे व्यवस्थापकांकडून गतिशक्तीच्या कामांचा आढावा

Latest Marathi News रेल्वेचे डबे, इंजिन, चाके भंगारात: सोलापूर विभागाने कमावले ४२.६४ कोटी Brought to You By : Bharat Live News Media.