राजस्थानला मोठा झटका; जॉस बटलर स्वस्तात माघारी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज आयपीएल 2024 चा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे. परंतु, सामन्यात वरूण राज्याने हजेरी लावल्याने नाणेफेकीला विलंब झाला. यानंतर पंचांनी मैदानावर साफ झाल्यावर नाणेफेकीचा निर्णय घेतला. यामध्ये गुजरातच्या कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (RR vs GT)
राजस्थानला मोठा झटका; जॉस बटलर स्वस्तात माघारी
सामन्याच्या सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर राशिद खानने जॉस बटलरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत राहूल तेवातिया करवी झेलबाद केले. बटलरने आपल्या खेळीत 10 बॉलमध्ये 8 धावा केल्या.
राजस्थानला पहिला धक्का; यशस्वी जैस्वाल बाद
उमेश यादवने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. आपल्या खेळीत जैस्वालने 19 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. यशस्वी आणि बटलरमध्ये पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी रचली.
राजस्थान गुणतालिकेत अव्वलस्थानी
आयपीएलच्या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची लढत गुजरात टायटन्सशी होत आहे. शुभमनच्या नेतृत्वाखालील गुजरात संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफसाठी या सामन्यात विजय मिळवणे गुजरातसाठी महत्वाचे आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने यंदाच्या हंगामात एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यांत त्यांचे आठ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. त्याच वेळी, चार संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन संघांचे प्रत्येकी चार गुण आणि तीन संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. अशा स्थितीत या वेळी अंतिम चारमध्ये पोहोचण्याची लढत अत्यंत रंजक असणार आहे.
दोन्ही संघात बदल
संघात दोन बदल करण्यात आले आहेत. केन विल्यमसनच्या जागी मॅथ्यू वेडला संधी मिळाली असून शरथच्या जागी अभिनव मनोहरचा संघात समावेश करण्यात आला आहे. गुजरातने मॅथ्यू वेड, राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन आणि नूर अहमद या चार परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवले आहे. त्याच वेळी, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्टसह तीन परदेशी खेळाडू राजस्थानकडून खेळताना दिसणार आहेत.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर : शरथ बीआर, शाहरुख खान, दर्शन नळकांडे, रविश्रीनिवासन साई किशोर, मानव सुथार.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर : रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, शुभम दुबे, केशव महाराज, नवदीप सैनी.
Toss ✅
…aur Captain Gill ne liya hai pehle 𝙜𝙚𝙣𝙙𝙗𝙖𝙖𝙯𝙞 karne ka faisla 👊#AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 | #RRvGT
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 10, 2024
हेही वाचा :
Dhule Loksabha 2024 | धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 586 ग्रामपंचायतीत मतदार जनजागृती महारॅली
महत्वाची बातमी ! चाळीसगावच्या ब्लॉकमुळे 10 गाड्या रद्द, 5 गाड्यांच्या मार्गात बदल
सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी : नाना पटोले
Latest Marathi News राजस्थानला मोठा झटका; जॉस बटलर स्वस्तात माघारी Brought to You By : Bharat Live News Media.