धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 586 ग्रामपंचायतीत मतदार जनजागृती महारॅली

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकशाहीचा महोत्सव असून तो देशभर सुरू आहे. या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजवावा. यासाठी ‘मी मतदान करणार… आपणही मतदान करा असे आवाहन करीत धुळे जिल्ह्यातील 586 ग्रामपंचायतींत एकाच दिवशी व एकाचवेळी मतदार जनजागृती महारॅली उत्साहात संपन्न झाली. यावेळी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांत जिल्ह्यातील 4 … The post धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 586 ग्रामपंचायतीत मतदार जनजागृती महारॅली appeared first on पुढारी.

धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 586 ग्रामपंचायतीत मतदार जनजागृती महारॅली

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकशाहीचा महोत्सव असून तो देशभर सुरू आहे. या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजवावा. यासाठी ‘मी मतदान करणार… आपणही मतदान करा असे आवाहन करीत धुळे जिल्ह्यातील 586 ग्रामपंचायतींत एकाच दिवशी व एकाचवेळी मतदार जनजागृती महारॅली उत्साहात संपन्न झाली. यावेळी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांत जिल्ह्यातील 4 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. तर अडीच लाखापेक्षा जास्त मतदारांनी मी मतदान करणार असे संकल्प पत्र भरुन घेण्यात आले त्याचबरोबर 1 लाख 54 हजार 611 मतदारांनी व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड केले असून या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील 14 लाख 4 हजार 490 मतदारांची जनजागृती करण्यात आली. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप उपक्रमाचे (जिल्हा परिषद) नोडल अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 586 ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी (सकाळी 8 ते 10) मतदार जनजागृती महारॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्ह्यातील नागरीक, मतदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही जनजागृती महारॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद, महसुल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला. ही मतदार जनजागृती महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातील पंचायत समितीस्तरावर संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांना मदतीसाठी बुथस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षण, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी, तलाठी यांची मदत घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेवर विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, बचतगट महिला, ग्रामस्थांनी यावेळी मी मतदान करणार अशी शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, मेहंदी, मानवी साखळी इत्यादी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. तर मतदारांचे प्रबोधनासाठी पथनाट्य, भजनीमंडळ, कविता, नाटक, गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन, कॅम्पस ॲम्बेसेटर, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व ग्रामपंचायतीत स्वीप अंतर्गत जाहिरात फलक, सेल्फी पाईट लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचातीत स्थानिक बोलीभाषेतून मतदान करण्यास प्रोत्साहनपर 1 हजार 741 पेक्षा जास्त रिल व्हिडीओ मार्फत एका मिनिटांचा माहितीपट सादर करण्यात आला. या मतदार जनजागृती उपक्रमांत ग्रामसेवक, शिक्षक, स्थानिक कलाकार, युवकांना सहभागी करुन घेण्यात आले.
नवमतदार, युवक तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर लक्षात घेऊन मतदारांना सक्षम करण्याच्या हेतूने प्रत्येक 100 कुटूंबासाठी 3 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातील तंत्रस्नेही कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान घरोघरी जावून दीड लाखापेक्षा जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. अशा रितीने 5 नाविण्यपूर्ण संकल्पनेतून धुळे जिल्ह्यात मतदार जनजागृतीपर कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मतदार जनजागृती महारॅलीचा मुख्य कार्यक्रम सोनगीर, ता. जि. धुळे येथील एन. जी. बागुल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसिलदार अरुण शेवाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. ए. बोटे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, विठ्ठल घुगे (शिक्षण विस्तार अधिकारी), सौ. दिपाली देसले, सौ. सुजाता बोरसे (विस्तार अधिकारी व महिला बालकल्याण), सौ. सुरेखा देवरे (प्राथमिक शिक्षणाधिकारी व गट शिक्षण अधिकारी), उपशिक्षण अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री विभांडीक, डॉ. बळीराम चव्हाण, सौ. बी. ए. भामरे (शिक्षण विस्तार अधिकारी) सुनील बागुल (सोनगीर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष) ग्रामसेवक श्री. ठाकरे, एच. एस. विसपुते, प्राचार्य, एन जी बागुल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनगीर आदि मान्यवर उपस्थित होते.
मतदार जनजागृती महारॅलीत धुळे जिल्ह्यातील 3 लाख 26 हजार 736 कुटूंबांतील 14 लाख 4 हजार 490 मतदारांचा मतदार जनजागृती महारॅलीसह विविध उपक्रमात सहभाग नोंदवला. 1 लाख 54 हजार 611 मतदारांनी डाऊनलोड केले व्होटर हेल्पलाईप ॲप.,
2 लाख 54 हजार 409 मतदारांनी भरले संकल्प पत्र. महिला बचत गटाच्या 38 हजार 186 महिलांची उपस्थिती, 14 हजार 439 शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. 4 लाख 16 हजार 742 मतदारांनी घेतली मतदार प्रतिज्ञा. 1 हजार 576 रांगोळी, चित्रकला, निबंध, मेहंदी, वकृत्व, घोषवाक्य स्पर्धांचे आयेाजन झाले. मतदार जनजागृतीसाठी जिल्हाभरात आतापर्यंत 865 रॅलीचे आयोजन केले. 376 पथनाट्य कार्यक्रमांचे आयोजन, 532 मानवी साखळींतून मतदार जनजागृती करण्यात आली. 1 हजार 741 मतदार जनजागृती रील्स केले तयार केले. जिल्हाभरात 647 सेल्फी पाईंटची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यात 27 आयकॉनची निवङ करण्यात आली आहे.
हेही वाचा –

Goa Lok Sabha Elections : २५ वर्षांनंतर श्रीपाद नाईक- रमांकात खलप आमने-सामने; कोण बाजी मारणार ? 
‘आप’च्‍या भ्रष्‍टाचारावर ‘बाेट’ ठेवत मंत्री राजकुमार यांनी दिला राजीनामा
Rajya Sabha MP : नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी, महाराष्ट्रातून मिलिंद देवरा; डॉ. अजित गोपछडे यांनी घेतली शपथ

Latest Marathi News धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 586 ग्रामपंचायतीत मतदार जनजागृती महारॅली Brought to You By : Bharat Live News Media.