चिनी रॉकेट आदळल्याने चंद्रावर निर्माण झाली दोन विवरे

बीजिंग : मार्च 2022 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे एक रहस्यमय रॉकेट आदळले होते. त्यावर काही अज्ञात पेलोड (सामग्री) होती, ज्याबद्दल आजपर्यंत काहीही समजलेले नाही. या रॉकेटमुळे चंद्रावर दोन विवरे निर्माण झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. चंद्राच्या दुर्गम भागात हे रॉकेट आदळले होते. तत्पूर्वी ते अनेक वर्षे चंद्राभोवती फिरत होते. या रॉकेटबाबत पूर्वीही गूढच होते व आजही … The post चिनी रॉकेट आदळल्याने चंद्रावर निर्माण झाली दोन विवरे appeared first on पुढारी.
#image_title

चिनी रॉकेट आदळल्याने चंद्रावर निर्माण झाली दोन विवरे

बीजिंग : मार्च 2022 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे एक रहस्यमय रॉकेट आदळले होते. त्यावर काही अज्ञात पेलोड (सामग्री) होती, ज्याबद्दल आजपर्यंत काहीही समजलेले नाही. या रॉकेटमुळे चंद्रावर दोन विवरे निर्माण झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
चंद्राच्या दुर्गम भागात हे रॉकेट आदळले होते. तत्पूर्वी ते अनेक वर्षे चंद्राभोवती फिरत होते. या रॉकेटबाबत पूर्वीही गूढच होते व आजही त्याबद्दल माहिती स्पष्ट झालेली नाही. विशेष म्हणजे हे रॉकेट आदळल्यानंतर चंद्रावर एक नव्हे तर दोन विवरे निर्माण झालेली आहेत. याबाबतची माहिती ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये संशोधकांनी म्हटले आहे की चीनच्या ‘चेंगी 5 टी-1 रॉकेट’चे अपर स्टेज होते.
त्यावरून अज्ञात अतिरिक्त सामग्री किंवा पेलोड नेण्यात आले होते. त्याचा छडा सर्वप्रथम 2015 मध्ये लागला. त्यानंतर कॅटलिना स्काय सर्व्हेमधील संशोधकांनी जानेवारी 2022 मध्ये त्याला ‘डब्ल्यूई0913ए’ असे नाव दिले. अमेरिकेतील अवकाशीय कचर्‍यावर लक्ष ठेवणार्‍या बिल ग्रे यांनी भाकित केले की, हे रॉकेट काही महिन्यातच चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळू शकते. त्याप्रमाणे मार्च 2022 मध्येच ते कोसळले. आता ‘नासा’च्या ‘लुनार रिकनायसन्स ऑर्बिटर’ने या क्रॅश साईटचे जे छायाचित्र टिपले आहे. त्यावरून असे दिसून येते की, रॉकेट कोसळल्याने दोन विवरे निर्माण झाली आहेत.
The post चिनी रॉकेट आदळल्याने चंद्रावर निर्माण झाली दोन विवरे appeared first on पुढारी.

बीजिंग : मार्च 2022 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे एक रहस्यमय रॉकेट आदळले होते. त्यावर काही अज्ञात पेलोड (सामग्री) होती, ज्याबद्दल आजपर्यंत काहीही समजलेले नाही. या रॉकेटमुळे चंद्रावर दोन विवरे निर्माण झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. चंद्राच्या दुर्गम भागात हे रॉकेट आदळले होते. तत्पूर्वी ते अनेक वर्षे चंद्राभोवती फिरत होते. या रॉकेटबाबत पूर्वीही गूढच होते व आजही …

The post चिनी रॉकेट आदळल्याने चंद्रावर निर्माण झाली दोन विवरे appeared first on पुढारी.

Go to Source