अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा-अभिनेता गोविंदा याने मंगळवारी (दि. ९) सायंकाळी गुढीपाडव्याचे औचित्य साधत त्र्यंबकराजाची पूजा अभिषेक करत दर्शन घेतले. गोविंदा हा यापूर्वी अनेकदा त्र्यंबकला आला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तो प्रथमच त्र्यंबकराजाच्या द्वारी आला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे गट शिवसेना प्रचाराची धुरा त्याच्यावर आहे. यासाठी त्र्यंबकराजाचे आशीर्वाद लाभावे म्हणून त्याने येथे हजेरी … The post अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन appeared first on पुढारी.

अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन

त्र्यंबकेश्वर : Bharat Live News Media वृत्तसेवा-अभिनेता गोविंदा याने मंगळवारी (दि. ९) सायंकाळी गुढीपाडव्याचे औचित्य साधत त्र्यंबकराजाची पूजा अभिषेक करत दर्शन घेतले. गोविंदा हा यापूर्वी अनेकदा त्र्यंबकला आला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तो प्रथमच त्र्यंबकराजाच्या द्वारी आला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे गट शिवसेना प्रचाराची धुरा त्याच्यावर आहे. यासाठी त्र्यंबकराजाचे आशीर्वाद लाभावे म्हणून त्याने येथे हजेरी लावली अशी चर्चा होती. त्याच्यासोबत मुलगा यश व मोठे बंधू कीर्ती उपस्थित होते. देवस्थानतर्फे ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते.
हेही वाचा :

Bade Miyan Chote Miyan : अक्षय-टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या सीनला कात्री तर…; उद्या होणार रिलीज
जळगाव : ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून सव्वा लाखांची रक्कम पोबारा
Nashik Crime | हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा

Latest Marathi News अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजा चरणी लीन Brought to You By : Bharat Live News Media.