नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Rajya Sabha MP Swearing : राज्यसभेवर अलीकडेच निवडून आलेल्या खासदारांमधील १० नवनिर्वाचित खासदारांना उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून ६ खासदार राज्यसभेवर निवडुन गेले, त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा, भाजपचे डॉ. अजित गोपछडे यांनी आज शपथ घेतली. दरम्यान, राज्यातून निवडून गेलेले काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वीच शपथ घेतली आहे.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा, भाजपचे डॉ. अजित गोपछडे यांनी शपथ घेतली. याशिवाय भाजपचे मयांकभाई नायक, नारायण भंगाडे, अमरपाल मौर्य, संजय सेठ, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, समाजवादी पक्षाचे रामजी लाल सुमन, तृणमुल काँग्रेसच्या सागरिका घोष, ममता ठाकूर यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
The post नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी appeared first on Bharat Live News Media.


Home महत्वाची बातमी नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी
नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Rajya Sabha MP Swearing : राज्यसभेवर अलीकडेच निवडून आलेल्या खासदारांमधील १० नवनिर्वाचित खासदारांना उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून ६ खासदार राज्यसभेवर निवडुन गेले, त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा, भाजपचे डॉ. अजित गोपछडे यांनी आज शपथ घेतली. दरम्यान, राज्यातून निवडून गेलेले …
The post नवनिर्वाचित १० राज्यसभा खासदारांचा शपथविधी appeared first on पुढारी.