हृदयद्रावक : रवळगाव येथे टेबलफॅनचा शाॅक लागून मायलेकीचा मृत्यू
सेलू, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील रवळगाव येथे टेबलफॅनमध्ये विद्यूत प्रवाह उतरून मायलेकीला विजेचा धक्का लागून दोघींचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १०) सकाळी ९ च्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दीक्षा राहुल मकासरे (वय २६) व इंदू राहुल मकासरे (१वर्षे ६ महिने) या मायलेकींचा मृत्यू झाला.
रवळगाव येथे विद्युत रोहित्राच्या अर्थिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे घरगुती उपकरणामध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे. मागील अनेक दिवसांपासून दलितवस्ती येथे विद्युत उपकरणात विद्यूत प्रवाह उतरत असल्याची माहिती महावितरणला दिली होती. तसेच याबाबत पोलिसांना देखील कळवले होते. त्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.
तरीही महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मायलेकींचा बळी गेला. दोन निष्पापांना जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांकडून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा
परभणी : ताडकळसमध्ये वादळी वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस
परभणी : पूर्णा तालूक्यात अवकाळी पावसाची हजेरी
परभणी: पूर्णा येथे बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या तिघांना अटक
Latest Marathi News हृदयद्रावक : रवळगाव येथे टेबलफॅनचा शाॅक लागून मायलेकीचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.