दाणा बाजार परिसरात ट्रान्सपोर्ट कार्यालय फोडले; सव्वा लाख रक्कम पोबारा
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
शहरातील दाणा बाजार परिसरातील ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दाणा बाजार परिसरात जनता बँकेच्या पाठीमागे मोहम्मद अन्सार इंद्रीस (वय-३६) यांच्या मालकीचे अजिंठा ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. शनिवार (दि.६) रोजी रात्री ११.३० वाजता अज्ञात चोरट्यांनी फोडले. ट्रान्सपोर्टचे कार्यालय टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेली ९० हजार रुपयांची रोकड व पत्री गल्ल्यात ठेवण्यात आलेली ४० हजार रुपयांची चिल्लर अशी एकूण १ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. सोमवार (दि.८) रोजी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी कार्यालयाच्या ठिकाणी पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी मोहम्मद अन्सार इद्रीस यांच्या फिर्यादीवरुन रविवार (दि.७) रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सर्जेराव क्षिरसागर हे करत आहेत.
हेही वाचा:
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद; निफ्टीचाही नवा उच्चांक
अक्कलकोट : वटवृक्ष मंदिरात प्रकट दिन सोहळा संपन्न; हजारो भक्त स्वामी चरणी नतमस्तक
Mainpuri Lok Sabha: मैनपुरीत डिंपल यादवविरुद्ध भाजपचे जयवीरसिंह ठाकूर मैदानात
Latest Marathi News दाणा बाजार परिसरात ट्रान्सपोर्ट कार्यालय फोडले; सव्वा लाख रक्कम पोबारा Brought to You By : Bharat Live News Media.