सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद; ‘निफ्टी’चाही नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २.१३ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.१०) जोरदार खरेदी दिसून आली. विशेषतः आज बँकिंग शेअर्समधील तेजीमुळे बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने २२,७७५ चा नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी १११ अंकाच्या वाढीसह २२,७५३ वर स्थिरावला. तर सेन्सेक्स ३५४ अंकांनी वाढून ७५,०३८ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell) आज बँक, ऑईल आणि गॅस तसेच एफएमसीजी शेअर्समध्ये … The post सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद; ‘निफ्टी’चाही नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २.१३ लाख कोटी appeared first on पुढारी.
सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद; ‘निफ्टी’चाही नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २.१३ लाख कोटी

Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.१०) जोरदार खरेदी दिसून आली. विशेषतः आज बँकिंग शेअर्समधील तेजीमुळे बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने २२,७७५ चा नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी १११ अंकाच्या वाढीसह २२,७५३ वर स्थिरावला. तर सेन्सेक्स ३५४ अंकांनी वाढून ७५,०३८ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell) आज बँक, ऑईल आणि गॅस तसेच एफएमसीजी शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून आली. तर ऑटो शेअर्स कमजोर पडले.
विशेषतः मेटल क्षेत्रात अधिक खरेदी झाली. दरम्यान, फार्मा वगळता मीडिया, पीएसयू बँक, एफएमसीजी, ऑईल आणि गॅस १-२ टक्क्यांनी वाढले. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप ०.८ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला.
गुंतवणूकदारांनी कमावले २.१३ लाख कोटी
बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.१३ लाख कोटी रुपयांनी वाढून ४०२.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मंगळवारी बाजार भांडवल ३९९.९२ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांना २.१३ लाख कोटींचा फायदा झाला.
कोणते शेअर्स तेजीत
बीएसई सेन्सेक्सने आज ७५ हजारांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर आज आयटीसी, कोटक बँक, भारती एअरटेल, एसबीआय, एशियन पेंट्स, रिलायन्स, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर मारुती, एलटी, एचडीएफसी बँक, एम अँड एम या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टीने आज २२,७७५ चा नवा उच्चांक गाठला. निफ्टीवर कोल इंडिया, बीपीसीएल, हिंदाल्को, कोटक बँक, आयटीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी लाईफ, डिव्हिज लॅब, सिप्ला, मारुती, श्रीराम फायनान्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Closing Bell)
बँक निफ्टी पहिल्यांदाच ४९ हजारांवर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली निफ्टी पीएसयू बँकेने दिवसातील सर्वोत्तम कामगिरी केली. आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी, फेडरल बँक, कोटक बँक आणि बँक बडोदा यांसारख्या खासगी बँकांच्या शेअर्समधील तेजीच्या जोरावर बँक निफ्टीने प्रथमच ४९ हजारांच्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर बँक निफ्टी २५६ अंकांनी वाढून ४८,९८६ वर बंद झाला.
हे ही वाचा :

सोने ७२ हजार पार, चांदीही चमकली! दरवाढीचे कारण काय?
‘मल्टिअसेट अलोकेशन फंड’वरील कर आकारणी, जाणून घ्या याविषयी
जमाना ई-विमा पॉलिसीचा

Latest Marathi News सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद; ‘निफ्टी’चाही नवा उच्चांक, गुंतवणूकदारांनी कमावले २.१३ लाख कोटी Brought to You By : Bharat Live News Media.